भारत शासन व महाराष्ट्र शासन राजमुद्रा

जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर

स्वराज भवन, नागाळा पार्क, कोल्हापूर

Ph. 0231-2665813
desk12gb@gmail.com
क्र. कार्या.12अ/2/सेतू/आरआर/654/2026 दि. 21/08/2026
सूचना — नोंदणी बंद

अर्ज नोंदणीसाठी धन्यवाद!

आपले सरकार सेवा केंद्र आयडीसाठी अर्ज सादर केल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. सदर जाहिरातीसाठीची ऑनलाईन अर्ज नोंदणी दि. 25/09/2026 रोजी सायं. 11.59.59 वा. बंद झाली असून, आता नवीन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. प्राप्त अर्जांची तपासणी व पुढील प्रक्रिया खालील वेळापत्रकानुसार सुरू आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर • अर्ज नोंदणी बंद झाली आहे •
धन्यवाद नोंदणी बंद झाली आहे
795
ग्रामपंचायत क्षेत्र केंद्रे
(716 ग्रा.पं.)
13
नगरपरिषद / नगरपंचायत
क्षेत्र केंद्रे (05 क्षेत्रे)
63
कोल्हापूर महानगरपालिका
क्षेत्र केंद्रे
29
इचलकरंजी महानगरपालिका
क्षेत्र केंद्रे
पात्रता

पात्रता निकष

अर्जदाराने खालील सर्व अटी पूर्ण करणे आवश्यक राहील —

1

किमान वय 18 वर्षे पूर्ण असावे.

2

किमान उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (HSC) उत्तीर्ण असावे.

3

संगणकाचे मूलभूत ज्ञान आवश्यक. MS-CIT किंवा समकक्ष प्रमाणपत्रास प्राधान्य.

4

संबंधित ग्रामपंचायत/नगरपालिका/नगरपंचायत क्षेत्राचा स्थानिक रहिवासी असावा.

5

आधार क्रमांक, पॅन, बँक खाते व आवश्यक ओळखपत्र उपलब्ध असावे.

6

नैतिक अध:पतन, आर्थिक फसवणूक किंवा सायबर गुन्ह्याबाबत दोषी ठरलेला नसावा.

वेळापत्रक

अर्ज व निवड प्रक्रियेचे वेळापत्रक

क्र.टप्पातपशील
1 ऑनलाईन अर्ज कालावधी कोल्हापूर जिल्ह्याच्या assk.rtsakop.in या संकेतस्थळावर दि. 24/08/2026 रोजी सकाळी 9.45 पासून ते दि. 25/09/2026 रोजी सायंकाळी 11.59.59 PM पर्यंत ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील.
2 अर्जांची तपासणी दि. 09/09/2026 ते 31/10/2026 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने प्राप्त झालेल्या अर्जांची तपासणी करण्यात येईल.
3 मुलाखत (आवश्यक असल्यास) एका भौगोलिक क्षेत्रात एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास, मुलाखतीचे ठिकाण व कालावधी kolhapur.gov.in व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर स्वतंत्रपणे प्रसिद्ध केला जाईल.
4 अंतिम निवड यादी पात्र ठरलेल्या व्यक्तींची अंतिम निवड यादी kolhapur.gov.in या संकेतस्थळावर व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात येईल.
कृती

अर्ज कसा करावा

  • assk.rtsakop.in या संकेतस्थळावरून थेट ऑनलाईन अर्ज सादर करा.

  • किंवा जाहिरातीसोबत दिलेला QR कोड स्कॅन करून अर्ज भरण्याचे पान उघडा.

  • अर्जाचा नमुना, जाहिरातनामा व रिक्त केंद्रांची यादी kolhapur.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे — अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करा.

  • अंतिम मुदत — दि. 25/09/2026, सायं. 11.59.59 वाजेपर्यंत.

₹500
अर्ज शुल्क
प्रत्येक अर्जासाठी हे शुल्क ऑनलाईन पद्धतीने आकारले जाते.
वाचले

संदर्भ शासन निर्णय

  1. महाराष्ट्र शासन, माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) विभाग, शासन निर्णय क्र. मातंसं-1716/प्र.क्र.517/39, दिनांक 19 जानेवारी 2018.
  2. महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक — आसेकें-1725/प्र.क्र.86/मातं(39), दिनांक 27 मार्च 2025.
  3. महाराष्ट्र शासन, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभाग, शासन शुध्दिपत्रक क्र. आसेकें-2026/प्र.क्र.98/TECH-1 (E-1742666) दि. 09/07/2026.